आईबापानं काय केला गुन्हा गं / Aaibaapan Kay Kela Gunha G
—
अन मातापिता आवडतं नाही बाई कोना गं ।।१।।
या आईबापानं काय केला गुन्हा गं ।।१।।
या आईबापानं काय केला गुन्हा ।।१।।
आईबापाला आनंद झाला पोटींपुत्र बाळ जन्मला ।।१।।
आईबापाला आनंद झाला, पोटींपुत्र बाळ जन्मला गं ।।१।।
थाट बाट बारश्याच्या केला ।।२।।
पणं मातापिता आवडतं नाही बाई कोना गं ।।१।।
या आईबापानं काय केला गुन्हा गं ।।१।।
मातापिता आवडतं नाही बाई कोना गं ।।१।।
या आईबापानं काय केला गुन्हा गं ।।२।।
तळहाताचा पाळणा केला, न वाडीवरती लावलं याला ।।२।।
आईबापांचे उपकार मनात जाणागं, आईबापानं काय केला गुन्हा… गं ।।१।।
पण मातापिता आवडतं नाही बाई कोना गं ।।१।।
या आईबापानं काय केला गुन्हा गं ।।२।।
संसार केलानं उपाशी पोटीं, धनं ईशटेंट लेकासाठी ।।२।।
सून म्हणती नांवावर करून घ्यानाव,
या आईबापानं काय केला गुन्हा ।।२।।
मातापिता आवडतं नाही बाई कोना गं,
या आईबापानं काय केला गुन्हा ।।२।।
घरात जेवते राजा राणी, आईबापाला बोलावं कोणी ।।२।।
या आईबापाला सांगता येईना कुणा गं,
या आईबापानं काय केला गुन्हा ।।२।।
बई मातापिता आवडतं नाही हे कोना गं ,
या आईबापानं काय केला गुन्हा गं ।।१।।
या आईबापानं काय केला गुन्हा ।।१।।
आईबाप राहते उपाशी घरी, चारचौघा मधी नेवो करी ।।२।।
जन्म देऊन आपलं नशीब म्हणा गं,
या आईबापानं काय केला गुन्हा ।।२।।
मातापिता आवडतं नाही बाई कोना गं,
या आईबापानं काय केला गुन्हा गं ।।२।।
सून म्हणी जाऊद्या पंढरी, काम यायचं नाही ना घरी ।।२।।
गाडीत यांना लवकर बसून द्यानाव,
ह्या आईबापानं काय केला गुन्हा ।।२।।
मातापिता आवडतं नाही बाई कोना गं,
ह्या आईबापानं काय केला गुन्हा गं ।।२।।
ह्या आईबापानं काय केला गुन्हा गं…….. ।।१।।
— कांताबाई शिंदे