गावकुसाच्या बाहेरचं रूप बदलून गेलाय गं..२

कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं..२

कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं….कोरस-२

गवताची झोपडी आधी आत्ता आलोय बंगल्या मधी…२

नव्हती मिळत गोदडी साधी, आता झोपाया मऊमऊ गादी

फ्रीज टीव्ही आणि कुलर, सारं घरात आलय गं…२ 

कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं..२

कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं….कोरस-२

कालकाही नसे पोटातं,आत्ता पक्वान्न ताटात..२

फिरतो गाडीमधी थाटात,अंगठ्या घालूनी बोटातं

कुण्या देवानं केलच न्हाय, ते भीमानं केलय ग..२

कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं..२

कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं….कोरस-२

शिक्षणाच्या जोरावरं, गेलो मोठ्या जाग्यावरंं..२

कुठं अन्याय  होता जरं, प्रतिकार करी भिमवीर

असं दुध वाघीणीचं, माझ्या भीमानं दिलय गं…२

कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं..२

कालच्या महार वाड्याचं भीमनगर झालाय गं….कोरस-२ 

काल केली ज्यांची गुलामी, तेच करती आत्ता सलामी..२

हा चमत्कर घटनेचा, सांगतो ठासूनं तुला मी

आमची प्रगती पाहुनी, कुणी जाळूनं मेलाय गं..२

– संदीप शिंदे