गीत: या माझ्या दलित बांधवानो / Ya maza dalit Bandhavahno
गायक : वौशाली म्हाडे
गीतकार : मनोहर दीप, सुषमा
या माझ्या दलित बांधवानो
रंजल्यानो आणि गांजल्यानो
देईन तुम्हाला करून मी खुले
काळाराम मंदिर चवदार चे तळे
वर्षानुवर्षे हीन लेखूनिया
दूर लोटिले ज्या समाज्या
धुरा खांद्यावर मी वाहील तयाची
लावून पना प्राण माझा
विजयाच्या लावून पताका
मुक्यांना ही फोडीन वाचा
चालाया लावीन लुळे पांगळे
काळाराम मंदिर चवदार चे तळे
माणूस असुनी तुम्हा माणसांना
माणुसकीची जाणं नाही
मिंदे पणा सोड चल उठ गोवर्धन
जगण्यात या शान नाही
मुक्त बंधनातून व्हावंया
संग्राम या पुढे लढावया
तोडून सनातन रुढी चे कडे
काळाराम मंदिर चवदार चे तळे
या माझ्या दलित बांधवानो
रंजल्यानो आणि गांजल्यानो
देईन तुम्हाला करून मी खुले
काळाराम मंदिर चवदार चे तळे