शब्द मोडू नका…, उर झोडू नका…
जा भविष्या कडे…, धीर सोडु नका…
पेटता पेटता बोलली रे चिता !!2!!
जा मुलांनो आता, संपली रे कथा !!2!!
त्रीशरण पंच्चील आणि अष्टांगिके,
बुद्ध नामाचे ते शुद्ध मंगलाष्टीके !!2!!
संपल्या सम्पूदया, अश्रुच्या अक्षदा !!2!!
जा मुलांनो आता, संपली रे कथा !!2!!
न्याय केला निसर्गाने भिमाप्रती,
लाभली लाभली योग्य ती सदगती !!2!!
ना मिले सर्वथा, योग्य ती मान्यता !!2!!
जा मुलांनो आता, संपली रे कथा !!2!!
शब्द मोडू नका, उर झोडू नका
जा भविष्या मध्ये, धीर सोडु नका…हो…..ओ…..
शब्द मोडू नका, उर झोडू नका
जा भविष्या मध्ये, धीर सोडु नका !!1!!
काशीनंदा तू घ्यावी, अशी दक्षता
जा मुलांनो आता, संपली रे कथा !!3!!
पेटता पेटता बोलली रे चिता !!1!!
जा मुलांनो आता, संपली रे कथा !!2!!
संपली रे कथा…… !!3!!
— Unknown