महाडच्या तळ्याचं पाणी पेटलंग बाई
महाडच्या तळ्याचं पाणी पेटलंग बाई…!1!
त्या तळ्यात माझ्या भीमाची छवी भेटलं ग बाई
माई ग माझे माई, रमाई आई ग !!
माई ग माझे माई, भिमाई आई ग !!
भीम नावाचं इवल रोप दारी लावील ग !!2!!
त्या रोपाच बोधि रुक्ष आभाळी जाईल ग !!2!!
माई ग माझे माई, रमाई आई ग !!
माई ग माझे माई, भिमाई आई ग !!
मुक्याला फुल देई गाण्याला सुर ग !!3!!
मुकनायकाच्या शब्दाला धार येईल ग !!2!!
माई ग माझे माई, रमाई आई ग !!
माई ग माझे माई, भिमाई आई ग !!
नालांदाच्या त्या नजऱ्यांना शोदील ग बाई…. !!2!!
उजेडाच्या लाखो पिड्या घडविल ग बाई…. !!2!!
माई ग माझे माई, रमाई आई ग !!
माई ग माझे माई, भिमाई आई ग !!
भीमा तुझ्या निळाईची मी ओवी गायिल र…!!2!!
समतेच्या युगाच गाणं मोरं जाईल र…!!2!!
माई ग माझे माई, रमाई आई ग !!
माई ग माझे माई, भिमाई आई ग !! …3…