एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर ||2||
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर

सुंदर स्वराज्य निर्माण केले, तलवारीच्या धारेवर…
रयतेसाठी वार झेलले, आपुल्या निधडया छ्यातीवर ||2||
प्राण पणाने लढले मावळे, भरोसा ज्या राज्यावर ||2||

माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर

आठवण येते मनामनातुन, भगवा झेंडा दिसल्यावर
जात पात ना धर्म मानी तो, जगला माणुसकीवर||2||

पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा, शिवभक्तांच्या ह्रदयावर
हा पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या ह्रदयावर

माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर ||2||

माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर
शिवरायाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांचे दगडावर ||3||

छत्रपती शिवाजी महाराज कि जय
जय भवानी, जय शिवाजी… ||2||