गीत: लागला करायाला झूकूनी सलाम पून्हा / Lagla Karayala Zukuni Salam Punha
गीतकार- शाहिर विजयानंद जाधव
लागला करायाला, झूकूनी सलाम पून्हा
भीमा तुझं बाळ आता, झालं रे गुलाम पुंन्हा !!२!!
ओ नाव तुझं घेई, पण कालचा तो धूर नाही !!२!!
तुझ्या त्या रानामध्ये, राबणारा धूर नाही !!२!!
बोलक्या जिभेवरी, लागला लगाम पुंन्हा !!२!!
भीमा तुझं बाळ आता, झालं रे गुलाम पुंन्हा !!२!!
तुझ्या त्या चळवळीची, राख रांगोळी केली !!२!!
सिंहवाणी डळकाळी ची बंद आरोळी झाली !!२!!
कावळे कालचे….
कावळे कालचे, झाले बे लगाम पुन्हा !!२!!
तुझ्या त्या चळवळीची, राख रांगोळी केली !!२!!
सिंहवाणी डळकाळी ची बंद आरोळी झाली !!२!!
कावळे कालचे….
कावळे कालचे, झाले बे लगाम पुन्हा!!२!!
भीमा तुझं बाळ आता, झालं रे गुलाम पुंन्हा !!२!!
तव बुद्ध न्यानपीठ, नको तुझे चारपीठं !!२!!
पिठा पिठाने केली, नाशिकला मारपीठं !!२!!
झालं हे बाळ दुबळे, पुरविचारी धाम आता !!२!!
भीमा तुझं बाळ आता, झालं रे गुलाम पुंन्हा !!२!!
कोणी इथे विजयानंदा लेखणी वाळविणारे !!२!!
आपल्याच हाताने प्रतिमा माळविणारे !!२!!
वारा वाहे गात आहे….
वारा वाहे गात आहे…., आपले कराम पुन्हा !!२!!
भीमा तुझं बाळ आता, झालं रे गुलाम पुंन्हा !!२!!
लागला करायाला, झूकूनी सलाम पून्हा
भीमा तुझं बाळ आता, झालं रे गुलाम पुंन्हा !!२!!