11. कुंभारापरी तू भीमा

LYRIC

कुंभारापरी तू भीमा, समाजाला घडविले

धिक्कारुन गुलामीला ,बुद्धाकडे वळविले..

 

बावीस प्रतिज्ञेची, भीमा तू दीक्षा दिली

बुद्धाच्या विचारांची, भीमा तू भिक्षा दिली

प्रगतीच्या शिखरावरी, आम्हाला चढविले

 

जीवन उद्धरले, पाळताना पंचशीला

झोपडीच्या जागी आता, दिसू लागला बंगला.

लाचारी-गरीबीला, तूच दूर पळविले

 

दरवाजे केले खुले, शिक्षणाच्या भवनाचे

दूध आम्हा पाजियले, गुरगुरत्या वाघिणीचे.

तुझ्या कष्टापायी भीमा, खूप काही मिळविले

 

बुद्धाच्या धम्माने, केली लई नवलाई

धम्माकडे वळले, भीमा तुझे अनुयायी

सर्व पोटजातीला, अमृताने जुळविले

 

– अमृत ​​बागड़े

Share: