धम्मदीप हा मानवतेचा
धम्मदीप हा मानवतेचा जगताची प्रेरणा
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना
वंदना…. वंदना….. वंदना
बुद्धं सरणं मंत्र महान, बुद्धीवंत होऊया
धम्मं सरणं तंत्र महान, नीतीवंत होऊया
संघं सरणं व्हा बलवंत, प्रबल करू तन-मना
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना
आकाश अमुचे धरणी अमुची, विश्वची अमुचे सारे
मानवप्राणी समान सारे, सांगत सुटले वारे
प्रेम मैत्री ची बंधुभावना, फुलवी नवजीवना
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना
मनमयूर थुईथुई नाचे, स्वैरपणे निर्मल
स्वयंप्रकाशित जिणे जगावे, भवतु सब्ब मंगल
नागभूमी ती पावन झाली, स्फुर्ती मिळे कुंदना
महाकारुणी तथागताला त्रिवार ही वंदना
वंदना…. वंदना….. वंदना
– Kundan Kambale