भीमाच्या शिकवणीने सुधारलं माझं घर,
गरीबाची पोरं माझी झाली कलेक्टर ||2||
उपाशी राहून आम्ही दिवस काढलं,
पोरांना वेळेवरती शाळेत दाडलं ||2||
रोज लाकडाची मोडी, व्हायायची डोईवर||2||
गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर ||2||
भीमाच्या शिकवणीने … ||2||
भुकेनं माझं पोट, लागायचं पाठीला||
बांधून पैसा पैसा, ठेवायचे गाठीला ||
ठरविलं होतं तिला, बनवील विद्याधर ||2||
गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर ||2||
भीमाच्या शिकवणीने … ||2||
धन्याला दिलेलं वचन पाळलं,
पोरांच्या साठी माझं जीवन जाळलं ।।
लढून असवाली, बिजाईचा पदर ।।
गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर ||2||
भीमाच्या शिकवणीने … ||2||
धम्मांच्या वाटेनं, आंम्ही चाललो म्हणून,
दिल्लीहुन पोरगी, माझी आली कलेक्टर बनून ||
म्हणे विष्णू माझ्या कष्टाची, ठेविली कदर,
गरीबाची पोर माझी झाली कलेक्टर ||2||
भीमाच्या शिकवणीने … ||2||