तुझ्या हाती तूप आल, तुझ्या हाती साय !!2!!
समाजाचं कायर गड्या, समाजाचं काय !!1!!
तुझ्या हाती आहेर गड्या, समाजाची नाळी !!2!!
राहायला माडी, तूला बसायला गाडी !!2!!
अर सांग तुझा धंदा, आहे तरी काय !!2!!
समाजाचं कायर गड्या, समाजाचं काय !!2!!
रोज रोज हॉटेलात जेवता कसेरे !!
व्हिस्की, बियर, दारू रोज ढोसता कासेरे !!2!!
रोज रोज खाता कोबडीचे पाय !!
समाजाचं कायर गड्या, समाजाचं काय !!2!!
काम नाही धाम नाही, सकाळी ऊठुन !!
सुख तुला सारं गड्या येतर कुठुन !!
सांग तुझा छंद, आहे तरी काय !!
पण समाजाचं कायर गड्या, समाजाचं काय !!2!!
तुझ्या कड माझ्यासाठी, आहे तरी कायर !!
तुझ्यासाठी माझ्याकड, सार काही आहेर !!
आर पुसते रोज वामानला वामनची मायं!!
पण समाजाचं कायर गड्या, समाजाचं काय !!2!!
समाजाचं कायर गड्या, समाजाचं काय !!2!!
— Unknown