भीमा तुम्हा वंदना
द्यावी सुबुद्धी आम्हा अजाणा
तनमन अमुचे चरणी अर्पण
भावपूर्वक धम्म समर्पण
मंगलमय बुद्धाचे दर्शन
घडविले रामजीनंदना
ना डगमगले कधी संकटी
रान उठविले उपाशीपोटी
लढले झिजले न्यायासाठी
लाजविले गंधित चंदना
चंद्र-सूर्य तळपती जोवर
कीर्ती भूवर राहील तोवर
नवकोटीचा वीर धुरंधर
तोडियले सहजी बंधना
– बाल कुम्हार